coronavirus | कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा कोरोनामुळे मृत्यू
![]() |
coronavirus | कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा कोरोनामुळे मृत्यू |
कोरोना चा विळखा राज्याच दिवसेंदिवस वाढत जात आहे. युवासेना प्रमुख आणि
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरीळीत देखील
कोरोना चे रुग्ण आढळले आहेत. तीन दिवसापुर्वी मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे
कोरोना चा रुग्ण आढळल्यानं संपुर्ण कोळीवाडा कर्फ्यू लावून सील करण्यात आला
आहे. त्यातच आज कोरोनाची लागण झालेले कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी
यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोळी वाडा परिसरात सध्या महानगरपालिकेचे
अधिकारी लक्षण आढळलेल्या लोकांना तात्काळ क्वॉरन्टाईन करत आहे. सध्या
इथल्या 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वॉरन्टाईन
करण्यात आलं आहे.
दरम्य़ान मृत मोरेश्वर कोळी यांच्या पत्नी आणि मुलला देखील कस्तुरबा
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरळी परिसरात महापालिकेकडून
निर्जंतुकीकरण सुरु आहे.
देशात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या हजारांच्या वर गेली आहे. सध्या
देशात एकूण 2543 कोरोना बाधीत रुग्ण आहे. त्यातील 189 रुग्ण बरे झाले आहेत.
तर 53 रुग्णांचा कोरोना ने बळी घेतला आहे. तर इकडे राज्यात दिवसेंदिवस
कोरोना चा आकडा वाढत आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 81 कोरोना बाधीत रुग्ण आढळले. या 81 रुग्णांसह
राज्यात कोरोना च्या रुग्णांची संख्या 416 झाली आहे. तर 19 लोकांचा
आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबईत 57,
अहमदनगरमध्ये 9, ठाण्यात 5, बुलढाण्यात 1, औरंगाबाद मध्ये 2 असे रुग्ण
आढळले आहेत. त्यातच महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे धारावी सारख्या
झोपडपट्टीत आढळलेला कोरोनाचा रुग्ण तसंच दिल्लीत मर्कज च्या कार्यक्रमात
उपस्थित असलेल्या देशभरातील तबलिगी जमातशी जोडलेले नऊ हजार सदस्य आणि
त्यांच्याशी संबंधितांना क्वारंटाइन करण्यात आले आहे -त्यात महाराष्ट्राचा
देखील समावेश आहे . त्यांच्यामुळे अधिक लोकांना कोरोना ची लागण होण्याची
भीती व्यक्त केली जात आहे.
कुठं आढळले नवीन रुग्ण?
* मुंबई – 57
* पुणे – 6
* पिंपरी-चिंचवड – 3
* ठाणे – 5
* अहमदनगर – 9
* बुलडाणा – 1
* वसई – 1
* हिंगोली – 1
* पुणे – 6
* पिंपरी-चिंचवड – 3
* ठाणे – 5
* अहमदनगर – 9
* बुलडाणा – 1
* वसई – 1
* हिंगोली – 1
अलिकडे ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने
तात्काळ उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात विशेष 30 कोरोना रुग्णालय सुरु
केले आहेत. या रुग्णालयांत फक्त करोना रुग्णांवर उपचार केले जातील.
त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा करोनाबाधीतांच्या
उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
दिली आहे.
संबंधित बातम्या
संबंधित बातम्या
Post a Comment