प्रवासाची परवानगी द्या, पोलिसांकडे 70 हजार अर्ज
![]() |
प्रवासाची परवानगी द्या, पोलिसांकडे 70 हजार अर्ज |
ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता
देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी
यासाठी पोलिसांकडे तब्बल 70 हजार अर्ज आले आहेत. विविध कारणं देत प्रवासाची
परवानगी मिळावी, यासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात
31 मार्चपर्यंत लॉकडाऊन होता. परिणामी शाळांच्या परीक्षा रद्द झाल्याने
अनेकांनी आपल्या मुला-बाळांना गावाला पाठवलं होतं. त्यातच पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला.
लॉकडाऊनबाबत नागरिकांची अजिबात तयारी नव्हती. त्यामुळे बरेच लोक आहे तिथेच
अडकले.
अनेकांच्या घरी मेडिकल इमर्जन्सीची
परिस्थिती आहे. तर लॉकडाऊनमुळे काही कुटुंबातील पालक आणि मुलांची भेट होऊ
शकलेली नाही. त्यामुळे किमान राज्यातल्या राज्यात प्रवास करण्याची परवानगी
द्यावी, यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत.
सरकार अतिमहत्त्वाच्या कारणांसाठी काही
जणांना अटींसह प्रवासाची परवानगी देत आहे. मात्र आता प्रवासाच्या
परवानगीसाठी 70 हजार अर्ज आल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे
सरकार यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
दरम्यान, देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक
वगळता सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे.
Post a Comment