पुण्यातील खुप मोठा परिसर सील

Add caption
पुण्यातील खुप मोठा परिसर सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुण्यातील महर्षी नगर ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा काही किलोमीटरचा परिसर आणि संपुर्ण कोंढवा परिसर आज रात्रीपासून सील करण्यात येणार आहे. राज्यात सर्वात पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण पुण्यातच आढळला होता. आता जरी मुंबईत कोरोनाचे रुग्ण जात असले तरी सुरुवातीचा आठवडा पुणे राज्यात अग्रेसर होते. आता कोरोना संक्रमितांची संख्या धीम्या गतीने वाढत आहे. मात्र, याला आणखी अटकाव बसला नाही. परिणाणी कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेले भाग पुणे महापालिकेकडून सील करण्याचा निर्णय घेतला आहे. आताच्या घडीला पुण्यात 41 कोरोनाग्रस्त आहेत.

महर्षी नगर ते आरटीओ कार्यालयाच्या दरम्यान पुण्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, कसबा, रास्ता या पेठा, स्वारगेट, गुलटेकडी, मार्केटयार्ड, खडकमाळ वगैरे भागांचा समावेश होतो. या भागात कोरोनाचे 37 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. तर कोंढवा भागात पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. त्याचबरोबर हा सगळा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. हा परिसर सील केल्यानंतर या भागातील कोणालाही या परिसरातुन बाहेर पडता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात जाता येणार नाही. या परिसरातील गल्ली- बोळातील सगळे रस्ते बॅरीकेडींग करुन सील करण्याच्या सुचना महापालिकेकडून पोलिसांना करण्यात आल्यात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्या व्यक्ती मात्र ठराविक कालावधीत या भागात जाऊ शकतील. या दोन भागांव्यतिरिक्त आणखी काही भाग अशाप्रकारे येत्या दिवसांमधे सील करावे लागू शकतात असं महापालिकेने म्हटलयं. त्यामुळे संपुर्ण पुण्यातील नागरिकांनी आठवड्याभरासाठी लागणारा भाजीपाला आणि किराणा आधीच खरेदी करावा अशा लेखी सुचना देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आलीय.
No comments

Powered by Blogger.