स्पेशल आणि श्रमिक ट्रेन्स वगळता अन्य रेल्वेची 30 जूनपर्यंतची तिकीटं कॅन्सल
![]() |
स्पेशल आणि श्रमिक ट्रेन्स वगळता अन्य रेल्वेची 30 जूनपर्यंतची तिकीटं कॅन्सल |
देशात सामान्य रेल्वे सेवा सध्या तरी सुरु
करण्यात येणार नाही. रेल्वेने 30 जून किंवा त्याआधी प्रवास करण्यासाठी बुक
केलेली सर्व तिकीटं कॅन्सल केली आहेत. 30 जूनपर्यंत बुक करण्यात आलेल्या
सर्व प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे रिफंड करण्यात येणार आहेत. दरम्यान, सर्व
स्पेशल ट्रेन्स आणि श्रमिक स्पेशल ट्रेन्स आपल्या नियोजित वेळेनुसार सुरु
राहणार आहेत.
रेल्वने याआधी 17 मेपर्यंत रेल्वेची
तिकीटं कॅन्सल केली होती. आता रेल्वेने 30 जूनपर्यंत सर्व तिकीटं कॅन्सल
करणार असल्याची घोषणा केली आहे. देशात लॉकडाऊन सुरु असून या लॉकडाऊनचा
तिसरा टप्पा 17 मे रोजी संपणार आहे. 12 मे रोजी देशाला संबोधित करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा 17 मे नंतर सुरु होणार
असल्याचं सांगितलं होतं. 18 मेपासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार
आहे.
यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या
माहितीनुसार, लॉकडाऊनआधी बुक करण्यात आलेली 94 लाख तिकीटं रेल्वेने कॅन्सल
केली असून 1490 कोटी रूपये ग्राहकांना परत केले आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या
टप्प्यात 22 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत योजनाबद्ध पद्धतीने 830 कोटी रूपये
प्रवशांना परत केले होते. 25 मार्च रोजी लॉकडाऊनला सुरुवात होण्याच्या तीन
दिवस अगोदर 22 मार्चपासून सर्व नियमित प्रवाशी रेल्वेंसह आवश्यक नसलेल्या
रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
आता जी तिकीटं कॅन्सल करण्यात आली आहेत.
ती लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा रेल्वेने तिकीट बुकींग सुरु केली होती,
त्यावेळी बुक करण्यात आली होती.
सर्व स्पेशल आणि श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु राहणार
सरकारने कोरोना व्हायरस संसर्ग
रोखण्यासाठी सामान्य रेल्वे सेवा बंद केल्या आहेत. परंतु, सर्व स्पेशल आणि
श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु राहणार आहेत. रेल्वेच्या आदेशात सांगण्यात आलं
की, 'एक मेपासून सुरु करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेन सेवा आणि 12 मेपासून
सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेन सुरु राहणार आहेत.'
Post a Comment