दीपक मुंडे, नगरसेवक शरद यादव यांनी सुरु केली माजलगाव शहरात स्वछता मोहीम




दीपक मुंडे नगरसेवक शरद यादव यांनी सुरु केली माजलगाव शहरात स्वछता मोहीम
प्रभाग १ आणि प्रभाग १२ मध्ये स्वच्छता मोहीम!!

दीपक मुंडे, नगरसेवक शरद यादव यांनी सुरु केली स्वछता मोहीम

माजलगाव: शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य उभे टाकले आहे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याने विविध रोगाने डोके वर काढले असून डेंगू च्या रुग्णाची वाढ होत आहे असे असतांना शहर स्वछता मोहीम व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत होती त्यानुसार प्रभाग एक मध्ये उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक शरद यादव यांनी स्वतः उभा राहत स्वच्छतेची कामे करून घेत आहेत.
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग च्या ढीग शहारत विविध भागात साचले आहे नाल्या देखील तुबल्या असल्याने घाणीमुळे आजारास वाव मिळत आहे मागील आठ दिवसापासून शहारत डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले आहे शरतील अनेक रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत याचे कारण म्हणजे अस्वच्छता होय याच काळांत स्वछता होणे आवश्यक आहे त्यानुसार प्रभाग एक आणि प्रभाग बारा यात स्वच्छता मोहीम नगर परिषद च्या वतीने सुरु करण्यात आली आहे.ठिकठिकाणी साचलेला कचरा गोळा करून त्याची व्हिलेवाट लावून तुंबलेल्या नाल्या साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.यावेळी उपनगराध्यक्ष सुमन मुंडे नगरसेवक शरद यादव यांनी लक्ष देऊन स्वछता मोहीम सुरू केली आहे.त्याचबरोबर प्रभाग १२ मध्ये देखील स्वछता करण्यात येत आहे शहरात सर्वत्र ठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात येऊन रोगाला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


संपूर्ण शहरात हि स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे प्रभाग एक पासून स्वछता करण्यास सुरवात झाली असून आज रोजी काही प्रमाणात हि स्वछता मोहीम सुरू झाली असून आगामी दिवसात संपूर्ण स्वछता करण्यात येणार आहे.
                                                                        शरद यादव (नगरसेवक)
      

 
पावसाळ्या पूर्वी स्वछता असणे आवश्यक आहे त्यानुसार प्रभागातील स्वच्छतेला सुरवात केली आहे.संपूर्ण शहारत स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे.
                                                                       सुमनताई मुंडे
                                                             उपनगराध्यक्ष,माजलगाव न.प

 
 

No comments

Powered by Blogger.