Today Horoscope 14 May 2020


मेषः एक प्रसन्न दिवस. मनाप्रमाणे घटना घडतील. घरातील ज्येष्ठ मंडळी प्रेमाने वागतील. नवीन कार्यासाठी योग्य दिवस. मान, सन्मान वाढेल. धनलाभाचे योग. दिवस आळसात जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
वृषभः संततीबरोबर मौजमजा कराल. महत्त्वाच्या वस्तू गहाळ होण्याची शक्यता. चिंतामुक्त जगा. मित्रमंडळींकडून शुभ वार्ता मिळतील. लेखनासाठी उत्तम दिवस. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचा दिवस. कार्यालयीन कामांमध्ये सावधानता बाळगा.

मिथुनः प्रिय व्यक्तीची नाराजी ओढावेल. मनधरणी करावी लागेल. फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहा. रागावर नियंत्रण ठेवा. कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नवीन गोष्टीचा आरंभ करण्यासाठी योग्य दिवस.

कर्कः आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहा. आप्तेष्टांशी वाद वा संघर्ष होणार नाही, याची काळजी घ्या. अति उदारपणा टाळा. आजचा दिवस आनंदात जाईल. सुखकारक घटना घडतील. हितशत्रूंचा पाडाव होईल. काहीतरी हटके करण्याची इच्छा होईल. धोका पत्करू नका.

सिंहः आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. कार्यालयातील सहकार्यांची चांगली मदत होईल. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबातील वादविवाद टाळा.

कन्याः वैवाहिक आयुष्यातील अविस्मरणीय घटना घडेल. मौजमजा व करमणुकीचा दिवस. व्यक्तिमत्त्व बहरेल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. लिखाणासाठी उत्तम दिवस. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रामाणिकपणे काम केल्यास लाभ होईल.

तुळः आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. उत्साह नियंत्रणात ठेवा. स्वप्ने साकार होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी. खरेदी-विक्री करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. खर्चात वाढ होईल.

वृश्चिकः वायफळ चर्चा करू नका. उष्णतेचे विकार सतावतील. वाचनाचा आनंद लुटाल. नवीन कार्यारंभ करण्यास उत्तम दिवस. द्विधा मनस्थिती राहील. इतरांकडून प्रेरणा घ्याल. उत्तरार्धातील दिवस फायदा मिळवून देईल.

धनुः आर्थिक ताळेबंद चोख ठेवा. पैशाचा गैरवापर करू नका. संततीच्या अपेक्षा पूर्ण कराल. उत्तम संधींचा दिवस. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कार्यालयातील सहकाऱ्यांशी वाद घालू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्याचा योग आहे.

मकरः पती-पत्नीमध्ये एकमत होणे आज अशक्य. शक्यतो वाद टाळायला हवे. आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. दिवसाची सुरुवात उत्तम आणि प्रसन्न होईल. आरोग्यदायी व धनलाभाचा दिवस. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील.

कुंभः जवळच्या व्यक्तीचा आधार वाटेल. आर्थिक नियोजन काटेकोरपणे करा. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखाद्या गोष्टीत निर्णय घेताना अडचणी येतील. संवादातून नवे मार्ग सापडतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मीनः शेअर्समधील गुंतवणुकीतून तोटा होईल. निराशेच्या गर्तेत अडकू नका. गृहिणींनी घरगुती कामे वेळेत पूर्ण करावी. आज संपूर्ण दिवस उत्तम जाईल. व्यापार, उद्योगात लाभ होतील. धनलाभाचे योग आहेत. उत्तम संधींचा फायदा करून घ्यावा. वायफळ खर्च करू नका.

No comments

Powered by Blogger.