Today Rashi Bhavishya


मेष : विवाहितांसाठी आनंदी काळ राहील. मानसन्मानाचे आयोजित कार्यक्रम पुढे ढकलावे लागतील. व्यावसायिकांना आर्थिक फटका.

वृषभ : समजुतदार स्वभावामुळे अनेक संकटांमधून सहीसलामत सुटका होईल. प्रफुल्लित मनाने कामे कराल. आर्थिक व्यवहारात सतर्कता ठेवा.
मिथुन : संततीशी प्रेमाने वागा. तुम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहात, हे दाखवून द्या. व्यवसायात भागीदाराशी पटणे अशक्य.

कर्क : घरातील ज्येष्ठांच्या मदतीचे आर्थिक चणचण सोडवाल. मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल. नवीन योजना सुचतील.

सिंह : परिवारातील सदस्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. भविष्यकालीन योजनांचा विचार कराल. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कराल.

कन्या : मोठी बहीण अथवा भाऊ यांचा सल्ला महत्त्वाचा वाटेल. स्वयंसेवक म्हणून काम कराल. आधुनिक जीवनपद्धतीतील त्रुटी ठळकपणे जाणवतील.

तुळ : हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. प्रसिद्धी लाभेल. जोडीदाराचे नवीन रूप पाहायला मिळेल.

वृश्चिक : सकाळची सूर्यकिरणे मन प्रफुल्लीत करतील. वैवाहिक आयुष्यात सुखाचा झरा वाहेल. घरातील वातावरण उत्साही असेल.

धनु : तुमचा शांत स्वभाव प्रत्येक अडचणीवरचे औषध आहे. घरातील जादाची कामे कराल. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची विचारपूस कराल.

मकर : आयुष्यामध्ये भरभरून आनंद मिळेल. आरोग्याविषयी जागरुक राहाल. वैचारिक मतभेद असणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

कुंभ : व्यक्तिमत्त्वातील त्रुटी भरून काढा. तणावरहीत जगण्याचा प्रयत्न कराल. पती-पत्नीमधील नाते बहरेल.

मीन : दिवसाची सुरुवात आनंदाची वार्ता ऐकून होईल. प्रिय व्यक्तीला मनातील भावना स्पष्टपणे सांगा. उत्तरार्धात आवडते छंद जोपासाल.

No comments

Powered by Blogger.