आजचे राशीभविष्य

मेष:-चैनीच्या वस्तू खरेदी कराल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. थोडी काटकसर करावी लागेल. सामाजिक कामात मदत कराल.
वृषभ:-चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन मित्र जोडले जातील. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील.
मिथुन:-काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल. इच्छेविरूद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात. विचार योग्य प्रकारे मांडावेत.
कर्क:-व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
सिंह:-तुमच्यातील सुप्त गुण इतरांच्या नजरेत येतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सजावटीवर अधिक भर द्याल. घरात टापटीप ठेवाल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.
कन्या:-तुमच्यातील कालगुणांना चांगला वाव मिळेल. कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. काही महत्त्वाच्या कामांना खीळ बसू शकते. स्वत:च्या फायद्याचा आधी विचार कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
तूळ:-मनाच्या चंचलतेला आवर घालावी. एकसूत्री विचार करून चालणार नाही. पैज जिंकता येईल. कमी श्रमातून पैसे कमवाल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.
वृश्चिक:-एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत एकोप्याने कामे कराल. संपर्कातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण होतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. चारचौघात तुमची वाहवा केली जाईल.
धनू:-आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आळस झटकून टाकावा लागेल. नातेवाईक मदतीला उभे राहतील.
मकर:-तुमच्यातील कलागुण इतरांच्या नजरेत येतील. छंद जोपासायला अधिक वेळ द्याल. मित्र परिवार गोळा कराल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.
कुंभ:-दिवस समाधानात जाईल. नवीन गोष्टीत अधिक रुची दाखवाल. घरगुती कामे वेळेत पूर्ण होतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आवडत्या वस्तु खरेदी केल्या जातील.
मीन:-वाचनाची आवड जोपासता येईल. इतरांचे मनापासून कौतुक कराल. जवळच्या लोकांच्या आनंदात आनंद मानाल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. प्रवासाची हौस भागवाल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

No comments

Powered by Blogger.