महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पावसाने दमदार आगमन केले असून, उद्या गोव्यासह, महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील बहुतांश भागात या महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. मात्र मागील काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पाऊस आता गोव्यासह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यात मेघगर्जनेसह लावणार हजेरी
पुणे शहरात आज (२८ जून) दुपारनंतर पावसाचे दमदार आगमन झाले असून, उद्या (२९ जून) मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर ३० जून ते ४ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.