अमेरिकेसह जगाच्या अतोनात नुकसानाला फक्त चीन जबाबदार-ट्रम्प

अमेरिकेसह जगाच्या अतोनात नुकसानाला चीन जबाबदार आहे असं वक्तव्य आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. याचं कारण अर्थातच करोना आहे. करोनामुळे अनेक देशांची आर्थिक घडी आणि गणित विस्कटलं आहे. चायना व्हायरस असं नाव डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसला दिलंय. याआधीही त्यांनी चीनवर या व्हायरसवरुन आरोप केले आहेत. आता तर अमेरिकेसह जगात जे काही नुकसान होतंय त्याला चीन जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात की अमेरिकेसह जगभरात जे काही अतोनात नुकसान होतंय त्याला चीन जबाबदार आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातील ते गांभीर्याने घेतलं नाही. तसंच त्यांनी या व्हायरसला वुहान व्हायरस, चायना व्हायरस अशीही नावं दिली. मात्र सध्याच्या घडीला करोनाच्या सगळ्यात जास्त केसेस या अमेरिकेत आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ लाख ३० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. करोना अमेरिकेत नियंत्रणात आहे अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. मात्र वास्तव हेच आहे की परिस्थिती नियंत्रणात नाही. अमेरिका, भारत यांच्यासह जगातल्या प्रमुख देशांना या रोगाचा फटका बसला आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामध्ये अमेरिकेसह सगळ्या जगाच्या नुकसानाला चीन जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

No comments

Powered by Blogger.