नववर्ष स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य सज्ज


'थर्टी फर्स्ट' व नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी एकूणच जागोजागी होणाऱ्या पार्ट्या, रेस्टॉरंट यांमधील आयोजने व गर्दी यंदा २० ते २५ टक्के कमी असेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारने यंदा पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे हॉटेल क्षेत्रात चांगला उत्साह आहे. तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेलांमध्ये नावाजलेले गायक-गायिकांचे संगीत कार्यक्रम तसेच, डीजेच्या तालावरील पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे तिकीट साधारण दोन हजार रुपयांपासून सुरू होते. जोडप्यांसाठी तीन हजार रुपयांपासून तिकिटे आहेत. त्यामध्ये मनसोक्त डान्स, मद्य व स्टार्टर आदींचा समावेश आहे. मोठी हॉटेले नववर्षाचे स्वागत ग्राहकांसह करण्यासाठी सज्ज आहेत; परंतु लहान रेस्टॉरंटमध्ये काहीसा कमी उत्साह असल्याचे दिसून येते.


No comments

Powered by Blogger.