‘मरे’च्या चार विशेष गाड्या
नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वेने आठ उपनगरांमधून सीएसएमटी परिसरात येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवार, ३१ डिसेंबरच्या रात्री चार विशेष लोकल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुख्य आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी दोन-दोन गाड्या धावतील. या लोकल १२ डब्यांच्या असतील. डाउन मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान रात्री १.३० वाजता, तर अप मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान रात्री १.३० वाजता लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी ट्रेन रात्री १.३० वाजता आणि सीएसएमटी ते पनवेल ट्रेन रात्री १.३० वाजता सुटणार आहे. या लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार असल्यामुळे त्या सर्व स्थानकांवर थांबविण्यात येतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
Post a Comment