पुणेरी प्रपोज
पुणेरी प्रपोज 😂😂😂😂😂😂😂😂
एक सदाशीव पेठी चिरंजीव _(कधी नाही ते)_ प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले.
त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच!
प्रिय xxxxxx,
तू मला खूप आवडतेस.
मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां?
_(हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या)_
१) दूपारी १ ते ४ फोन करु नये.
२) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, साड्या माझ्याकडे मागू नये, आपल्या तीर्थरुपांकडून आणणे.
३) हाॅटेलमधे गेल्यास निम्मे बील भरावे.
४) महिन्यात फक्त एक सिनेमा दाखवला जाईल.
५) बाईकवर बसताना मला मिठी मारु नये, रस्त्यावर श्रुंगारीक चाळे करणे मला पसंत नाही.
६) पर्वतीवर फिरायला जाण्यासाठी वेळेवर यावे, ऊशीर करु नये. तू रिकामी असलीस तरी मला नोकरी आहे.
७) भेळ, पाणी पूरी, आईस्क्रीम जास्त खाऊ नये, माझ्या पगाराचा आकडा लक्षात ठेवावा.
८) भांडण झाल्यास फक्त एकदा समजूत काढण्यात येईल, नंतर अपमान होईल.
९) मी सतत तुझीच तारीफ करावी अशी अपेक्षा ठेवू नये, मला स्वतःची तारीफ करण्यास वेळ द्यावा.
आणि सगळ्यात महत्वाचे
१०) माझे प्रेम मान्य नसल्यास मी दिलेलं गुलाब पुष्प परत करावे, त्याची नासधूस करु नये.
मी त्याचा अन्यत्र वापर करीन.
〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜〜
ती सुद्धा सदाशिव पेठेतलीच, यावर तिने उत्तर दिले.
प्रिय xxxxx,
लिहीण्याची पद्धत म्हणून प्रिय लिहीले आहे.
इतक्यात गैर अर्थ काढू नये.
पहिली गोष्ट, तू पाठवलेल्या पत्रावर पुरेसे तिकीट लावलेले नव्हते.
लिफाफ्यावर तुझे नाव नसल्याने मी दंड भरून पत्र घेतले.
आधी कल्पना असती तर परत पाठवले असते. पुन्हा असा हलगर्जी पणा सहन केला जाणार नाही. यावेळी भरलेला दंड भेटू तेव्हा परत करावा.
१) १-४ मी झोपलेली असते. तेव्हा फोन करीन अशी अपेक्षा करणे हा माझा अपमान आहे.
२) टॉक टाईम दिल्यासच मी फोन करीन. अन्यथा फोन मी करणार नाही.
३) घरचे सोडून हॉटेलात जाण्याची हौस मला नाही. तू घेऊन गेल्यास मी बिल भरण्याचा प्रश्न येत नाही. ते तुलाच भरावे लागेल.
४)
मला सिनेमा पहायचा असल्यास मी कोणाही बरोबर जाऊन पाहीन. मी तुझ्याच बरोबर
जावे असा हट्ट असल्यास मध्यंतरात चहा आणि वड्यासह सर्व खर्च करावा लागेल .
५) जर बाईकवर मिठी तुला चालणार नसेल तर इतर कोणामागे बसण्याचा हक्क मी राखून ठेवीत आहे
Post a Comment