एकाचा राजकीय विजनवास तर दुसऱ्यांची उद्विग्नता

2004 ची लोकसभा निवडणुकीचे रंग भरण्यास सुरवात झाली होती बीड जिल्ह्यात तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड भाजप सोडून राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. भाजप तर्फे प्रकाशदादा सोळंके यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले भाजपचा पराभव झाला जयसिंगराव गायकवाड विजयी झाले परंतु आगामी पाचच वर्षात जयसिंगराव गायकवाड कायमचे राजकीय विजनवासात गेले कारण पवारांच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता संपली होती. 2004 साली वाजत गाजत त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत झाले परंतु पुढच्याच निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना तिकीटच नाकारले. भाजपमधे असताना प्रदेश सरचिटणीस,राज्य मंत्रिमंडळात मंत्री तसेच थेट अटलजी, अडवाणी यांच्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास सारखे मोठे खाते सांभाळलेले जयसिंगराव गायकवाड आज कुठे आहेत? तर राजकीय विजनवासात कारण काय भाजप सोडणे .
जे जयसिंगराव गायकवाड यांच्या बाबतीत घडले त्याची पुनरावृत्ती प्रकाशदादा सोळंके यांच्या बाबतीत झाली राजकारण घाणेरडे व किळसवाणे बनले आहे मी आता थांबू इच्छितो ही उद्विग्नता त्यांच्या मनात का आली? कारण त्यांचीही पवारांच्या दृष्टीने उपयुक्तता संपली आहे हे त्यांच्या लक्षात आले असावे आजमितीस जरी प्रकाशदादा राष्ट्रवादीत असले किंवा त्यांचे घराणे जरी काँग्रेस च्या संस्कारातले असले तरीही प्रकाश दादांच्या राजकारणाची प्राथमिक जडणघडण भारतीय जनता पक्षा अंतर्गतच झाली.
भाजपमध्ये 90 च्या दशकात जी बोटावर मोजण्या एवढी बलाढ्य आमदार मंडळी होती त्यात प्रकाश दादांचे स्थान खूप वरचे होते त्या काळात जर भाजप जर सत्तेत आली असती तर त्यांचे कॅबिनेट निश्चित होते. आज त्याच सोळंकेना राष्ट्रवादीत साध्या राज्यमंत्री पदाकरिता उद्विग्न होऊन राजकारणच सोडावे असे वाटत आहे त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही कारण त्यांच्या वयाच्या अर्धही वय नसणाऱ्या, प्रथमच विधानसभेच तोंड पाहिलेले व दुधाचे दातही न पडलेले थेट कॅबिनेट पदावर आरूढ होताना स्वतःचा अवमान कोण सहन करेल. प्रकाशदादाला राष्ट्रवादीत जाऊन 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण होत आहे साधारण 14 वर्षात पिढी बदलते अस म्हणतात म्हणजे जवळपास एक पिढी गेली दादा राष्ट्रवादीत आहेत ते राजीनामा देतील का? माहीत नाही कदाचित पवार त्यांची समजूत काढतीलही पण मुलांच्या वयाचे कॅबिनेट मंत्री होत असताना त्यांच्या हाताखाली काम करायचे का सन्मानाने थांबायचे हे त्यांनीच ठरवावे
पण किमान पुढल्या पिढीने तरी पुढच्याच ठेच मागचा शहाणा या नीतीने स्वतःचा मार्ग ठरवावा कारण जयसिंगराव गायकवाड यांची पुढची पिढी राजकारणात दिसत नाही परंतु प्रकाशदादांची दिसते.
बीड जिल्ह्यात मुंडे घराण्या व्यतिरिक्त राज्य स्तरावर नेतृत्व विकास का होऊ शकला नाही हा वेगळा तसेच चिंतनाचा विषय असतानाही छोट्या जहागिरीच्या मोहापायी स्वतःच्या संस्थानावरच पाणी सोडणारे बीड जिल्ह्यासाठी तरी नवे नाहीत. कारण बीड हा पवारसाहेबांचा आवडता जिल्हा आहे हे ऐकत ऐकतच चार चार पिढ्या खपल्या व संपल्या तरीही जिल्ह्याच्या बाहेर त्यांचा नेतृत्व विकास व विस्तार होऊ शकला नाही किंवा होऊ दिला नाही हे कटू पण सत्य आहे .
पवन मोगरेकर
दी 1 जानेवारी

Post a Comment