बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेवारी रोजी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत,बीड जी प च्या पाच बंडखोर सदस्यांमुळे हा नवा ट्विस्ट आला आहे .
बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या पाच सदस्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते,त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते,याबाबत या पाच सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती
दरम्यान 4 जानेवारी 2020 रोजी अध्यक्ष पदासाठी मतदान होनार आहे,यावेळी या सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी त्यांनी केली,त्यावर न्यायालयाने याबाबत 13 जानेवारी रोजी सुनावणी ठेवली असून तो पर्यंत अध्यक्षपदासाठीचा निकाल जाहीर करू नये असे आदेशीत केले आहे .
Post a Comment