आजचे राशिभविष्य; 16 जानेवारी



1. मेष : प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका. मनाची तयारी नसताना काही कामे करावी लागतील.

2. वृषभ : अनावश्यक बडबड व्यवसायातील प्रगती रोखेल. महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यापूर्वी समतोल विचार करा. 

3. मिथुन : अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. 

4. कर्क : दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता. 

5. सिंह : मित्रांबरोबर पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आनंदाची बातमी मिळेल.

6. कन्या: मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. मान-सन्मान वाढेल.

7. तूळ: काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता. एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. 

8. वृश्चिक : नोकरदार व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल.

9. धनु: स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. 

10. मकर : फुशारकी मारू नका. कोणावरही विसंबणे नको. स्वार्थ जपणाऱ्या लोकांशी मैत्री करू नका.

11. कुंभ : घरगुती नात्यामध्ये व्यावसायिक संबंध नकोच. कार्यालयीन कामकाजात चालढकल करू नका. 

12. मीन : विवाहबंधनात बांधले जाल. अनपेक्षित लाभ होतील. कौटुंबीक अडचणी प्रथम सोडवा.

No comments

Powered by Blogger.