बॉलिवूडचा मराठी द्वेष

 बॉलिवूडचा मराठी द्वेष

1994-95  चा काळ असावा नाना पाटेकर चा तिरंगा चित्रपट हिट ठरला होता त्या चित्रपटातील एका वाक्याला संपूर्ण चित्रपट गृहात टाळ्यांचा कडकडाट पडायचा तो डायलॉग होता मराठा मारता है या मरता है महाराष्ट्राच्या मातीला हा सुखद अनुभव होता कारण बॉलिवूड सुरू झाल्यापासून मराठा या नावाला मोठ्या पडद्यावर येण्यास तब्बल 81 वर्ष वाट पहावी लागली बॉलिवूड ची सुरवात एका मराठी माणसाने केली होती का? हा प्रश्न मनाला पडायचा, काल तानाजी चित्रपट पाहत असताना क्षणा क्षणाला पडणाऱ्या टाळ्या, शिट्ट्या व घोषणांनी संपूर्ण चित्रपट गृह रंगून गेले होते शरद केळकर याने रंगविलेले छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा जेंव्हा पडद्यावर यायचे तेंव्हा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा हे सगळं जरी चांगलं वाटत असल तरीही अद्याप पर्यंत शिवाजी महाराज यांच्यावर बॉलिवूड मध्ये चित्रपट का निर्माण केला नाही असा प्रश्न मनाला सतावतो
साधारण 1913 साली बॉम्बे फिल्म इंडस्ट्री ला सुरवात झाली दादासाहेब फाळके या मराठी माणसाने चित्रपट सृष्टीची मुहूर्तवेढ रोवली फाळणी नंतर बॉम्बे फिल्म इंडस्ट्री चे बॉलिवूड नामकरण झाले.
शिवाजी महाराज यांची गणना जगातील सर्वोत्कृष्ट योध्दा म्हणून होते  परंतु त्यांच्यावर अद्याप पर्यंत एकही चित्रपट नाही हे कटू वास्तव आहे जगाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सेनापती म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते लिओनिदास, अलेक्झांडर द ग्रेट, हँणीबल बरका,स्पारटस, ज्युलियस सीझर, अँटीलाद द हून, सलादिन, नेपोलियन बोणापार्ट, सायरस द ग्रेट, यांच्यावर हॉलिवूड मध्ये कित्येक चित्रपट आले ज्युलियस सीझर व अलेक्झांडर द ग्रेट वरती तर चित्रपटांची शृंखलाच आली होती या चित्रपटामुळे या सेनापतींचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला अलेक्झांडर द ग्रेट वरती हॉलिवूड शिवाय प्रत्येक भाषेत चित्रपट निघाली दुर्दैव हे की ज्या सिकंदरचा पराभव भारतात केला गेला त्या हिंदू राजा पुरु किंवा पोरस वरती चित्रपट न काढता 1941 साली सिकंदर या नावाने अलेक्झांडर वर भारतात चित्रपट काढला गेला त्यात पृथ्वीराज कपूर यांनी अलेक्झांडर चा रोल केला होता.

मुगल  साम्राज्यावर आधारित आपल्या बॉलिवूड मधे एक नाही दोन नाही तब्बल 35 चित्रपट आले त्या चित्रपटाच्या नावावरून बॉलिवूड मुघल साम्राज्याच्या प्रेमात किती आकंठ बुडाले होते याचा प्रत्यय येतो सर्व मुघल सम्राटावर चित्रपट निघाले एवढंच नाही तर त्यांच्या दरबारातील कवी, नृत्यांगना,प्रेमिका,शायर, गायक यांच्यावरही चित्रपट निघाले त्यात अनारकली वरती तीन चित्रपट, ताजमहल वर आधारित पाच चित्रपट शिवाय ज्यांच्या नावाने ताजमहल बांधला त्या मुमताज वर चार चित्रपट,ज्याने हा ताजमहल बांधला त्या शहाजहांन वर तब्बल चार चित्रपट तसेच आदिल जहांगीर, अकबर सलीम, बैजू बावरा,एक दिन का सुलतान,जनरल बखत खान, हुमायून, जहाआरा, मुघले आजम, पुकार 1939,तानसेन, वारीस शाह,द ग्रेट मुघल, बाबर, वॉरिए ऑफ एम्पायर,मिर्झा गालिब, उमराव जान, रझिया सुलतान, द स्वाँर्ड ऑफ टिपू सुलतान,पाकिजा,जोधा अकबर,सतरंज के खिलाडी,द लास्ट मुघल अशी मुघल साम्राज्याच्या संस्कृतीवर चित्रपट निघाली या चित्रपटातून मुघल साम्राज्य,त्यांच्या संस्कृतीचे दर्शन मुघलांच्या प्रेम कथा,शौर्य, विरह,आकंठ प्रेमात बुडालेल्या मुघल राजकुमारांचा हिंदी क्लासिकल गाण्यातील रोमान्स पाहूनच भारतातील 4 पिढया वाढल्या सामान्य घरातील युवक युवतीही स्वतःला सलीम अनारकली समजत असा तो काळ आणि याच काळाला बॉलिवूड चा सुवर्णकाळ म्हणून संबोधला जातो आणि हे सर्व होत असताना मराठ्यांच्या संघर्षमय कालखंडा कडे हेतूपुरस्कृत पणे दुर्लक्ष करण्यात आले.

  मराठी चित्रपटात मात्र भालजी पेंढारकरांनी शिवाजी महाराजावर आधारित 14 चित्रपटांची निर्मिती केली परंतु गांधी हत्येत नंतर उसळलेल्या दंगलीत त्यांचा कोल्हापूरातील स्टुडिओ काँग्रेस च्या अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधीवादी कार्यकर्त्यांनी जाळला चित्रीकरण पूर्ण झालेले तीन ऐतिहासिक चित्रपट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले स्वातंत्र्या नंतर 2015 साला पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठ्यांच्या इतिहासावर बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट निघाला नाही 2015 साली मात्र सलीम व अनारकलीच्या प्रेमाच्या प्रभावातून बॉलिवूड 70 वर्षांनी बाहेर पडले बाजीराव मस्तानी,पानिपत व तानाजी चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता समाजमन काय आहे याचा चित्रपट निर्मात्याला अंदाज आला आहे .
पुढील काही वर्षात हिंदीत मराठ्यांच्या इतिहासावर काही चित्रपट येणार आहेत ही चांगली बाब असताना जगाच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट योद्धे म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर 2014 पूर्वी चित्रपट का येऊ शकले नाही हा प्रश्न अजूनही मनाला पडतो,निर्मात्यांना प्रोत्साहन व राजाश्रयच मिळाला नाही का ?????

No comments

Powered by Blogger.