बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादी-कॉग्रेस कड़े

 


राज्यातील सत्ता परिवर्तनाचा फटका बीड जिल्ह्यातील राजकारणास बसला. महाआघाडीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.जि.प.च्या पहिल्या टर्ममध्ये जशी मोडतोड करून पंकजा मुंडे यांनी भाजपला सत्तेत आणले होते,  यावेळेस भाजपला सुरुंग लावून तीन सदस्य फोडत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद ताब्यात घेतली.

#बीड जिल्हा परिषद

शिवकन्या सिरसाट राष्ट्रवादी अध्यक्ष 32

योगिनी थोरात भाजप 21
 




उपाध्यक्ष
बजरंग सोनवणे राष्ट्रवादी 32
संतोष हांगे.. भाजपा 21

१. संजय नवले पाटोदा (भाजपा)
२. उध्दव दरेकर आष्टी (भाजपा)
३. सविता मस्के गेवराई (भाजपा)
४. सतिश शिंदे (भाजप पण संद्या राष्ट्रवादी)
५. राजासाहेब देशमुख (कॉग्रेस)
६. शेप अंबाजोगाई (मुंदडा गट)
व बदामराव पंडीत गट (शिवसेना) ४ सदस्य
राष्ट्रवादी कडे गेले.


अधिकृत  निकल १३  तारखेला ज़ाहिर  होणार  असला  तरी राष्ट्रवादी काँग्रेस ला  शिवसेना  भाजप  बंडखोर  आणि  काँग्रेसच्या  सदस्यांनी  मदत केली,त्यामुळे आज  काँग्रेसच्या   उमेदवार शिवकन्या सिरसाट या अध्यक्ष  म्हणून ,बजरंग सोनवणे हे उपाध्यक्ष म्हणून  ३२ मते  घेऊन  विजयी  झाले  विरोधी  भाजपच्या  उमेदवार योगिनी थोरात यांना २१   मते मिळाली.

काँग्रेसचा एक सदस्य भाजपने फोडला परंतु,महाआघाडीस त्याचा काही फरक पडला नाही. मागील दोन वर्षांत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपयश आल्यानंतर धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले होते.

२०१९ ची परळी विधानसभा निवडणूक अस्तित्वाची समजून लढले आणि पंकजा मुंडेंचा पराभव करीत २०१४ च्या पराभवाची परतफेड केली.राज्यातील सत्ता बदलात धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या दीड महिन्यांतच त्यांनी बीड जिल्हा परिषद ताब्यात घेऊन बहिणीला दुसरा धक्का दिला. ६० सदस्यांच्या सभागृहात पाच सदस्य अपात्र, तर बाळासाहेब आजबे आणि संदीप क्षीरसागर आमदार झाल्यामुळे त्यांच्या दोन जागा रिक्त झाल्या. त्यामुळे ५३ सदस्यांच्या या सभागृहात बहुमतासाठी २७ सदस्यांची आवश्यकता होती. राज्याप्रमाणेच या जिल्हा परिषदेतही महाआघाडीचा पॅटर्न राबवत शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळवली. पहिल्या टर्ममध्ये राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा ग्रामविकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी तोडफोड करीत अशक्य असलेली जि.प.ची सत्ता हस्तगत केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य भाजपने फोडले होते. त्यापैकी पाच सदस्यांना अपात्र घोषित करीत मतदानापासून वंचित ठेवले आहे. पंकजा मुंडे यांचा हा पॅटर्न धनंजय मुंडे यांनी राबविला.भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभावमागच्या वेळी भाजपसोबत असलेल्या शिवसेनेच्या ४ आणि काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेऊन भाजपला धोबीपछाड दिली.

"सत्तेत आलेल्या धनंजय मुंडे यांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमविलेच नाही तर ही लढाई एकतर्फी जिंकली."

No comments

Powered by Blogger.