जे.पी. नड्डा भाजपचे नवे 'अध्यक्ष '
![]() |
जे.पी. नड्डा भाजपचे नवे 'अध्यक्ष ' |
रविवारी
झालेल्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,
मुख्यमंत्री विजय रूपाणी, मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, धर्मेंद्र प्रधान,
अनुराग ठाकुर, यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सह अन्य मोठे नेते हजर
होते. जेपी नड्डा यांची राजकीय सुरुवात ही महाविद्यालयीन राजकारणापासून
सुरू झाली. अनेक वर्षांपासून त्यांना संघटनेचा अनुभव आहे. स्वच्छ प्रतिमा
असलेले नड्डा यांची संघाशीही (RSS) त्यांची चांगली जवळीक आहे. भाजपचे
वरिष्ठ नेता राधामोहन सिंह (Radhamohan Singh) हे पक्षाच्या राष्ट्रीय
अध्यक्षाच्या निवडीसाठीच्या प्रक्रियेत प्रभारी आहे. राष्ट्रीय अध्यक्ष
निवडीसाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहे आणि त्यानंतर निवड
प्रक्रिया सुरू होईल.
जुलै महिन्यात कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची निवड झाली होती. मोदी
सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहा यांची गृहमंत्रिपदी निवड झाली.
त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यासाठी नावांचा शोध सुरू होता. कारण
आतापर्यंत पक्षात 'एक व्यक्ती एक पद' ही परंपरा पहिल्यापासून कायम आहे.
Post a Comment