भारताच्या सीमारेषेवर अत्याधुनिक ड्रोन होणार तैनात

भारताच्या सीमारेषेवर अत्याधुनिक ड्रोन होणार तैनात

सीमारेषेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होतेय. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आणि इतर साधनांचा वापर करून दहशतवादी भारतीय सीमारेषेत घुसवले जातात. त्यामुळं पाकिस्तानच्या सीमारेषेवर अत्याधुनिक एन्टी ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात  येणार आहे.  त्यामुळं पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध लागण्यास मदत होणार आहे.  एन्टी ड्रोन सिस्टीममध्ये जामर आणि सेन्सर असणार आहे. तसेच यात 360 डिग्री नियंत्रण ठेवण्याची प्रणाली आहे. त्यामुळं भारताच्या सीमेत घुसखोरी करणाऱ्या कोणत्याही ड्रोनवर लक्ष ठेवता येणार आहे.

आता दहशतवाद्यांचे भारताच्या सीमेत घुसण्याचे सर्व मनसुबे धुळीस मिळणार आहे. कारण बीएसएफच्या ताफ्यात अत्याधुनिक एन्टी ड्रोन सिस्टम दाखल होणार आहे. त्यामुळं सीमारेषेवरून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यास मदत होणार आहे.

गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर भारतातील एका कंपनीन अत्याधुनिक ड्रोन सिस्टीम तयार केली आहे. ही एन्टी ड्रोन सिस्टीम भारताच्या सीमारेषेवर लक्ष ठेवणाऱ्या ड्रोनवर नजर ठेवणार आहे.  सुरुवातील बीएसएफच्या ताफ्यात 10 एन्टी ड्रोन सिस्टीम दाखल होणार आहे. पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर हा ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. या ड्रोनमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहे.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एन्टी ड्रोन सिस्टीमध्ये अनेक कॅमेरे असणार आहे. तसेच ड्रोनमध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा असणार आहे. रेडिओ फ्रीक्वेन्सी रिसीवर, इलेक्ट्रो ऑप्टिक सेंसर, जॅमर आणि नियंत्रण मिळवणारी सर्व साधने एन्टी ड्रोन सिस्टीममध्ये उपलब्ध असणार आहे. ड्रोनची दिशाही यामुळं रडावर अचुक सांगता येणार आहे.

No comments

Powered by Blogger.