सरपंच, नगराध्यक्ष सदस्यांतून निवडणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरपंच, नगराध्यक्ष सदस्यांतून निवडणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 थेट सरपंच निवडणूक रद्द करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केल्या आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्षांची निवडही (Nagaradhyaksha Sarpanch Election) आता नगरसेवकांमधून होणार आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे थेट नगराध्यक्ष निवड रद्द करून पूर्वीची सदस्यांमधून निवड पुन्हा चालू करण्याचा निर्णय मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आला. 
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर येथे घेतलेल्या बैठकीत थेट सरपंच निवड रद्द करण्याचे संकेत या आधीच दिले होते. आता सरपंचापाठोपाठ नगराध्यक्षही सदस्यांमधून निवडून येणार आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारने थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. तो निर्णय आता ठाकरे सरकारने रद्द केला आहे. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यासंदर्भात प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. त्याचप्रमाणे सरपंचही थेट निवडण्याबाबत मागच्या सरकारने शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र आता महाविकास आघाडी सरकार हे निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पूर्वीप्रमाणे नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड होईल.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते.
या बैठकीत अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधि आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसुदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.'

No comments

Powered by Blogger.