'तान्हाजी' चित्रपटात जन्मस्थळ बदलल्यामुळे गावकरी नाराज

'तान्हाजी' चित्रपटात जन्मस्थळ बदलल्यामुळे गावकरी नाराज
'तान्हाजी ' चित्रपट आता नविन वादाच्या भोव-यात अडकताना पहायला मिळत असून तानाजी मालुसरे यांचा चुकिचा इतिहास सांगितला गेल्याची खंत त्यांच्या जन्म गावातून होताना पाहयाला मिळत आहे. त्यांच्या या वादातून त्यांच्या मुळ गावात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोडवली गावात जेमतेम 450 घर आहेत. गावातली लोकसंख्या 2200 च्या आसपास आहे. गावातला इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे यांच जन्म गाव आहे. गावाचा इतिहास पुस्तकात सांगितला गेला असला तरी चित्रपटातून मात्र तानाजी मालुसरे यांचे गाव उंबरट म्हणून दाखवल गेल आहे. तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावाचा उल्लेख कोठेच न केल्यानं गाव संतप्त आहे.
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजीराजेंना जाऊन मिळाले आणि नंतरचा शिवरायांसोबतचा तानाजींचा इतिहास घडला. तानाजी मालुसरे यांच्या जीवनपटावर जो काही चित्रपट सध्या प्रदर्शित झाला त्यात चित्रपटात मात्र तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव असलेल्या गोडवली या गावचा कोठेच उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे तानाजी मालुसरे यांची भाऊबंदकी मात्र या चित्रपटावर नाराज असून त्यांनी या बाबत राग व्यक्त केला आहे.
चित्रपटातून तानाजी मालुसरे यांचा र्धवट दाखवलेल्या इतिहासामुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही तानाजी मालूसरे यांच्या गावातील असल्याचा सार्थ अभिमान असल्याच मत गावातील युवक युवती सांगत आहे.

No comments

Powered by Blogger.