म्हशीला कुत्र चावल्यामुळे अख्ख गाव दवाखान्यात

म्हशीला कुत्र चावल्यामुळे अख्ख गाव दवाखान्यात
 कोल्हापुरात एका म्हशीला कुत्रा चावला आणि संपूर्ण गाव रेबीजची लस घ्यायला दवाखान्यात गेलं. करवीर तालुक्यातील शिये गावात हा प्रकार घडला आहे.कुत्रा चावताच रेबीजची लस घ्यावी लागते. ज्याला कुत्रा चावला आहे, त्याने ही लस घेणं गरजेचं असतं. 
ज्या म्हशीला रेबीजची लागण झाली होती, तिचं दूध आपल्या पिण्यात तर आलं नाही ना? आणि तसं झालं असेल तर आपल्यालाही रेबीज होईल या भीतीने रेबीजची लस घेण्यासाठी दवाखान्याकडे धाव घेतली. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयातही एकच झुंबड उडाली.
शिये ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांपूर्वी हनुमान नगरातील एका शेतकऱ्याच्या म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. 4 दिवसांपूर्वी या म्हशीचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात या म्हशीला रेबीज झाल्याचं समोर आलं आणि त्याचा धसका संपूर्ण गावानं घेतला आणि अख्खा गावच दवाखान्यात पळाला.
दूध उकळून घेतलं असेल, तर रेबीजचा धोका नाही. मात्र कच्चं दूध प्यायलं असल्यास संबंधितांना रेबीजची लागण होण्याची शक्यता आहे, असं वैद्यकीय सांगतात. त्यामुळे  जे लोक कच्च दूध प्यायलेत, त्यांनी रेबीजची लस अवश्य घ्यावी, असं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडलं आहे.

No comments

Powered by Blogger.