कांजुरमार्ग स्थानकावर 'रेल रोको' आंदोलन

कांजुरमार्ग स्थानकावर 'रेल रोको'
 कांजुरमार्ग स्थानकावर 'रेल रोको':
मुंबईतील कांजुरमार्ग रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅक आंदोलन केल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. सकाळी चाकरमानी कार्यालयाच्या दिशेने वाटचाल करीत असताना रेल रोकोमुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या अनियमितपणामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना आज सकाळी रेल रोकोमुळे कार्यालयात जाण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज ‘भारत बंद’चा इशारा देण्यात आला होता.
कांजूरमार्ग येथे काही कार्यकर्ते लोकल रेल्वे रोखण्यासाठी रुळावरून उतरले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आता वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. बहुजन क्रांती मोर्चाने CAA आणि  NRC विरोधात ‘भारत बंद’ची हाक पुकारली आहे. देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करण्य़ासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या रेल रोकोमुळे मध्ये रेल्वे विस्कळीत झाली असून कांजुरमार्ग येथे बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने आज भारत बंदचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कांजूरमार्ग येथे काही कार्यकर्ते लोकल रोखण्यासाठी रुळावर उतरले होते. काही काळ रेल रोको केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याचा रेल्वे प्रशासनाने दावा केला आहे. मात्र या रेल रोकोमुळे पुढील काही तास मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे उशीराने धावण्याची शक्य़ता आहे. ज्याचा नाहक त्रास चाकरमान्यांना करावा लागणार आहे.

No comments

Powered by Blogger.