काश्मीरनामा
हजारोंची
हत्या,त्यांचा अपराध काय होता, अपराध एकच होता ते सर्व हिंदू होते
सर्वांच्या घरासमोर पोस्टर चिटकवले होते त्यात काश्मिरी भाषेत तीन सूचना
होत्या
1. रलीव-म्हणचे काश्मिरात रहायचं असेल सर्व हिंदूंनी त्यांचा धर्म बदलावा
2. सलिव-धर्म बदलने शक्य नसल्यास काश्मीर सोडून जावे
3. गलिव-अन्यथा मरा
19
जानेवारी 1989 च्या रात्री शेती,नौकरी, घर, संपत्ती सोडून जवळपास 3 लाख
हिंदूनी काश्मीर सोडले पुढील दोन महिन्यात जवळपास 10 लाख काश्मिरी हिंदूंनी
काश्मिरी खोर सोडून निर्वासित बनले कुणी दिल्लीतील रस्त्यावर, कुणी
मुंबईतील रस्त्यावर तर कुणी कडाक्याच्या थंडीत हरीयाणातील मैदानी प्रदेशात
आश्रय घेतला,काश्मीर न सोडल्याने हजारोंची हत्या करण्यात आली कडाक्याच्या
थंडीने शेकडो लहान मूल व आबाल वृद्धांचा मृत्यू झाला इस्राएल मधल्या
ज्यूंना बेघर होऊन इतर देशात आश्रय घ्यावा लागला परंतु इथे तर स्वतःच्याच
देशात काश्मिरी हिंदूंना निर्वासित व्हावे लागले,साहजिक आहे सर्वांना
प्रश्न पडला असेल सरकार काय करीत होती तर केंद्र सरकार मधील तत्कालीन
गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद यांची मुलगी डॉ रुबिया सईद हिचे फुटीरतावाद्यांनी
अपहरण केले होते त्या बदल्यात अटकेत असलेल्या दहशतवाद्यांना सोडून द्यावे
अशी अपहरणकर्त्यांनी अट घातल्याने त्यांना तुरुंगातून सोडण्यात गृहमंत्री
दंग होते,गृहमंत्र्यांची कुटुंब जिथे सुरक्षित नव्हतं तिथे खोऱ्यातील
सामान्य हिंदू जनता कुणाकडे पाहणार राज्य सरकार बरखास्त करण्यात आले होते,
काश्मिर खोऱ्यातून लाखोंच्या संख्येत काश्मिरी हिंदू पलायन करत होते तरीही
देशातील सर्व बुद्धिजीवी, समाजवादी,सर्वधर्मसमभाव मानणारी सो कॉलड लॉबी
शांत होती कुठेही साधा निषेधही नव्हता धरणे व उपोषण तर लांबच अनेक
वृत्तपत्रांनी तर दखलही घेतली नव्हती
त्या सर्व काश्मिरी हिंदूंचा अपराध काय होता?
19 जानेवारी
Post a Comment