LIC पॉलिसी 31 जानेवारीपासून बंद होणार 23 प्लान

LIC पॉलिसी 31 जानेवारीपासून बंद होणार 23 प्लान
भविष्य सुरक्षित जावं यासाठी तरुणपणापासून विमा घेण्याचा आणि LIC मध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या देशात अनेक विमा कंपन्या ग्राहकांच्या शोधात आहे. मात्र त्यातही सर्वांची विश्वासार्हता असलेली म्हणजे LIC पाॅलिसी. देशातील अधिकतर ग्राहकांचा LIC च्या पॉलिसी घेण्याकडे कल असतो. जर तुम्ही भारतीय जीवन बीमा निगम (Life Insurance Corporation of India) खरेदी करण्याचा प्लान करीत असाल तर ही बातमी नक्की वाचा. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (Life Insurance Corporation of India) लवकरच तब्बल 23 पॉलिसी बंद करणार आहेत. IRDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या 23 पॉलिसी नव्या स्वरुपात लॉन्च करण्यात येणार आहे. LIC पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून या पॉलिसी नव्या स्वरुपात ग्राहकांसाठी आणणार आहेत.

LIC न्यू जीवन आनंद (New Jeevan Anand), जीवन उमंग (Jeevan Umang), जीवन लक्ष्य (Jeevan lakshy) यांसारखे प्रसिद्ध प्लान बंद करणार आहे.

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार LIC चे प्लान बंद झाल्याने नव्या पॉलिसींमध्ये फक्त रिटर्म कमी मिळण्याची शक्यता आहे. नव्या पॉलिसीची प्रिमियम वाढण्याची शक्यता आहे. याकारणाने LIC च्या ग्राहकांना 31 जानेवारीच्या आधी या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.

No comments

Powered by Blogger.