Zomato ने Uber Eats घेतलं विकत

Zomato ने Uber Eats घेतलं विकत
ऑनलाइन फूड डिलिव्हरीमधली कंपनी Zomato ने उबर ईट्स इंडिया (Uber Eats India)ही कंपनी विकत घेतली आहे. Zomato ने उबर इट्सचा भारतातला बिझनेस सुमारे 35 कोटी डॉलर म्हणजे 2 हजार 485 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार 'उबर'कडे फक्त 9.9 टक्के शेअर्स असतील. उबर ईट्स इंडिया ही कंपनी फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रात फारशी चांगली कामगिरी करत नव्हती. त्यातच प्रतिस्पर्धी असलेली Zomato ही कंपनी विकत घेणार, अशी चर्चा होती.

उबर कंपनी जर एखाद्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नसेल तर ती कंपनी त्या क्षेत्रातून बाहेर पडते, असं उबरचं धोरण आहे. त्यामुळेच उबर इट्स इंडिया ही कंपनी Zomato ला विकण्याचा निर्णय घेतला असावा, असं कळतं.

No comments

Powered by Blogger.