हॉलिवूडसह आता बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीला ‘या’ चॅलेंजने लावले याड
सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड येईल हे सांगता येत नाही. या
ट्रेंडसोबतच अनेक नवनवीन चॅलेंज देखील सोशल मीडियावर येत असतात. हे चॅलेंज
पूर्ण करण्याचा सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वचजण प्रयत्न करत
असतात. सध्या अशाच एका चॅलेंजने हॉलिवूडपासून ते मराठी कलकारांपर्यंत
सर्वांनाच वेड लावले आहे.

सुरुवातीला हा ट्रेंड हॉलिवूडमध्ये आला होता. आता तो हळूहळू
बॉलिवूडपासून ते मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत येऊन पोहोचला आहे. इतकच नव्हे
तर या फोटोंचे मीम्स देखील तयार करण्यात आले आहेत.
LinkedIn, Instagram, Facebook, Tinder
अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे तुमचे प्रोफाइल फोटो एकाच
ठिकाणी कोलाज करुन ते पोस्ट करण्यात येत आहेत. हा फोटो पोस्ट करत
#linkedinfacebookinstagramtinder हा हॅशटॅग वापरण्यात येत आहे.
#linkedinfacebookinstagramtinder
Post a Comment