भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिला टी२०आय: श्रेयस अय्यर फटाक्यांनी न्यूझीलंडवर भारताला 6 गडी राखून विजय मिळवून दिला.
![]() |
भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिला टी२०आय: श्रेयस अय्यर फटाक्यांनी न्यूझीलंडवर भारताला 6 गडी राखून विजय मिळवून दिला. |
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी
परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी
भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने
दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद
केली आहे. ५६ धावांवर राहुल इश सोधीच्या
गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव
सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला.
यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी
करत संघाला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान भारताने ६ गडी
राखत पूर्ण केलं. लोकेश राहुलने या सामन्यात ५६ तर विराट कोहलीने ४५
धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत
नाबाद ५८ धावा केल्या. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-० ने
आघाडीही घेतली आहे.
दरम्यान या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला.
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या इतिहासात दोन्ही संघातल्या ५ खेळाडूंनी
अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
कॉलिन मुनरो - 59 (42)
केन विल्यमसन - 51 (26)
रॉस टेलर - 54* (27)
केएल राहुल - 56 (27)
श्रेयस अय्यर - 58* (29)
केन विल्यमसन - 51 (26)
रॉस टेलर - 54* (27)
केएल राहुल - 56 (27)
श्रेयस अय्यर - 58* (29)
Post a Comment