असे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप
उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ही दालन वाटप करण्यात आली.
शंभू राजे देसाई ,दत्ता भरणे ,राजेंद्र पाटिल ,बच्चू कडु ,संजय बनसोड ,प्राजक्त तनपुरे या राज्यमंत्र्यांना मंत्र्यालयात दालन देण्यात आले नाही। मंत्र्यालयाऐवजी ६ राज्यमंत्र्यांना विधान भवनाथ दालन देण्यत अले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील उत्तरेकडील मुख्य दालन देण्यात आले आहे. मंत्रालयाव्यतिरिक्त काही राज्यमंत्र्यांना विधानभवनातील कार्यालयेही देण्यात आलेली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील ७१७ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.
Post a Comment