मोदी सरकारच्या 'या' 5 योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि दुप्पट पैसे मिळवा
![]() |
मोदी सरकारच्या 'या' 5 योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि दुप्पट पैसे मिळवा |
मुंबई, 08 जानेवारी: संकटकाळात अचानक पैशांची गरज पडल्यानंतर अडनडीला पैसे नसतात. अशावेळी आधीपासून व्यवस्थित पैशांची बचक केली तर फायदा अधिक होतो. ही बचत करताना असे काही प्लान निवडा ज्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदा होईल. सरकारच्याही काही योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 6 गुंतवणुकींबाबत माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवलेत तर जवळपास दुप्पट पैसे पुन्हा तुमच्या खात्यात येतील. अशा कोणत्या योजना आहेत ज्या सर्वात जास्त फायदेशीर आहेत.
1.सुकन्या समृद्धी योजना-
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवलेत तर तुम्हाला त्यावर साधारण 8.40 टक्के रिटर्न ज्यास्त मिळतात. मुलाच्या लग्नाचा आणि शिक्षणाच्या खर्चासाठी तुम्ही या बँक खात्यात पैसे बचत करू शकता. मुलीच्या वयाच्या 5 वर्षांनंतर एक ठरावीक रक्कम महिन्याला बचत खात्यात साठवायची आहे. मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर खात्याची मॅच्युरिटी पूर्ण होते. यावर 8.40 टक्के व्याजदर मिळत. मॅच्युरिटीनंतर त्यावर कर्ज लागत नाही.
2.पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF)
दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर PPF अकाऊंट उघडा. यावर तुम्हाला 7.9 टक्के व्याजदर मिळत आहे. तुम्ही 500 रुपयांपासून कितीही रुपयांपर्यंत बचत करू शकता. दर महिन्याला ही रक्कम तुमच्या खात्यातून पीपीएफ अकाऊंटला जमा होईल.
3.प्रधानमंत्री श्रम योगी मानधन- प्रत्येक महिन्याला मिळेल 3000 रुपये पेंशन
दर महिन्याला 15 हजार रुपये कमवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष योजना आहे. वयाच्या 60 वर्षांपर्यंत तुम्ही पैसे खात्यात जमा करायचे आहेत. दर महिन्याला तुम्हाला 55 रुपयांची बचत करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेंन्शन म्हणून मिळणार आहेत.
4.किसान विकास पत्र
Central Government कडून शेतकऱ्यांसाठी ही खास योजना सुरू करण्यात आली आहे. 9 वर्ष 5 महिन्यांसाठी शेतकऱ्यांना पैशांची बचत करायची आहे. तुम्ही आजच्या घडीला 50 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करत असाल तर 2029 पर्य़ंत तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात.
5.अटल पेंशन योजना- महिन्याला मिळणार 5000 रुपये
वयाच्या 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंत तुम्ही 1000 रुपयांची बचत करा. त्यानंतर तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर 5000 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळेल.
Post a Comment