अक्षय कुमारवर मराठा शासकांचा अवमान केल्याचा आरोप
![]() |
अक्षय कुमारवर मराठा शासकांचा अवमान केल्याचा आरोप |
अक्षय कुमार एका जाहिरातीमुळे वादात अडकला आहे. निरमा वॉशिंग पावडरची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत अक्षय कुमारने एका मराठा राजाची भूमिका केली आहे.
या जाहिरातीमुळे शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याचं म्हणत अक्षय कुमारविरोधात मुंबईच्या वरळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही कळतंय.
जाहिरातीत मराठा राजा असलेला अक्षय कुमार युद्ध जिंकून आपल्या सैनिकांसह महालात प्रवेश करतो. त्यावेळी त्या सगळ्यांचे कपडे मळलेले असतात. हे बघून एक महिला म्हणते युद्ध जिंकलात पण कपडे तर आम्हालाच धुवावे लागतात. यावर अक्षय कुमार म्हणतो, "महाराज और उसकी सेना दुश्मन को धोना जानती है और अपने कपडे भी." यानंतर महाराजांसह सर्व सैनिक निरमा वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुतात.
महाराजांना अशापद्धतीने चित्रित करण्यात आल्याने सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर ट्वीटरवर #BoycottNirma हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला.
ट्वीटरवर आलेल्या काही प्रतिक्रिया बघूया..
शिवप्रेमी असाल तरी ही अॅड हेटफुल म्हणून रिपोर्ट करा. मावळ्यांचा अपमान खपवून घेऊ नका.
हर्षद ढमाळे लिहितात, "बॉलीवुड कायम आमच्या इतिहासाला, आमच्या संस्कृतीलाच लक्ष्य का करतात? मग ते केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असो. दबंग 3 मध्ये साधुंची थट्टा आणि आता निरमामध्ये मराठा सरदारांची थट्टा उडवण्यात आली आहे."
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये ते लिहितात "मराठा सरदार स्वराज्यासाठी लढले, त्यांची नक्कल करणं अपमान आहे. निरमा आणि अक्षय कुमार यांनी सार्वजनिक माफी मागावी आणी ही जाहिरात ताबडतोब मागे घ्यावी."
गोविंद चोडणकर म्हणतात, "मराठा सरदार देशाचा अभिमान आहेत. त्यांची मस्करी करण्याचा निरमाला अधिकार नाही. निरमा आणि अक्षय कुमार यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे."
Post a Comment