मनसेच्या नव्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर तब्बल तेरा वर्षांनी प्रथमच पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन आज (गुरुवार) गोरेगाव येथील नेस्को संकुलात पार पडत आहे.
या अधिवेशनातच राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा नवीन रुपात सादर केला. पक्षाच्या धोरणांबद्दल मी संध्याकाळी बोलेन, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते नेस्को संकुलात जमा झाले आहेत. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे अन्य पदाधिकारीही महाअधिवेशनाला उपस्थित होते.
मनसेच्या ट्विटर पेजवरच्या महाअधिवेशनासंदर्भातील व्हीडिओमध्ये 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' असा उल्लेख आहे. मनसेच्या बॅनरवरही हेच शब्द झळकत आहेत.
त्यामुळे मनसे आता हिंदुत्वाच्या वाटेवर जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे? महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा असल्यामुळे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

No comments

Powered by Blogger.