‘द फॉरगॉटन आर्मी’मधील शर्वरी आणि मनोहर जोशींमध्ये काय आहे कनेक्शन?

अॅमेझॉन प्राइमवरील 'द फॉरगॉटन आर्मी' या वेब सीरिजची सध्या फार चर्चा आहे. कबीर सिंग दिग्दर्शित या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यामध्ये विकी कौशलचा भाऊ सनी कौशल आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून शर्वरीने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. पदार्पणातच तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे शर्वरी वाघचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी खास नाते आहे. शर्वरी ही मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे.
शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध उद्योगपती आहेत. शर्वरी लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'बंटी और बबली'च्या सीक्वलमध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये तिच्यासोबत 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिका साकारणार आहे. 

शर्वरीने याआधी 'प्यार का पंचनामा २', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. सुरुवातीला सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचं ठरवलेल्या शर्वरीला अभिनयाची फार आवड होती. शर्वरीने लहानपणी नाट्यकार्यशाळांमध्ये भाग घेतला असून शाळेत असताना तिने बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं.

No comments

Powered by Blogger.