सुबोध भावेने ही मागणी करताच कॉग्रेस मंत्र्याने केल हे ट्वीट

सुबोध भावेने ही मागणी करताच कॉग्रेस मंत्र्याने केल हे ट्वीट
आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच नवीन संकल्पना मांडण्यासाठी सेलिब्रेटींगकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो. ट्वीटर हे त्यासाठी प्रभावी माध्यम समजलं जातं. अभिनेता सुबोध भावे यानेही एक ट्वीट करत तरुण कलाकारांना वाव देण्यासाठी नाट्यगृहांबाबत एक नवी संकल्पना मांडली आहे.
'महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत. प्रत्येक ठिकाणी काही दररोज नाटकाचे प्रयोग होत नाहीत. अशावेळी त्या त्या ठिकाणच्या नाटकात काम करणाऱ्या तरुणांना ते उपलब्ध करून दिले तर किमान ज्यासाठी ते नाट्यगृह बांधलंय त्यासाठी तरी त्याचा उपयोग होईल आणि रंगकर्मींना हक्काचं व्यासपीठ मिळेल,' अशी मागणी ट्विटरद्वारे सुबोध भावने केली.
सुबोध भावे याच्या मागणीनंतर काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्वरित याबाबत प्रतिसाद दिला आहे. 'सुबोध जी, आपली संकल्पना उत्तम आहे. याबाबत काही नियम करता येतील का याबद्दल मी प्रयत्न करीन.  कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील नाट्यगृहे तरुण रंगकर्मींना, प्रायोगिक नाट्यकर्मींना उपलब्ध राहतील याची ग्वाही देतो,' असं ट्वीट सतेज पाटील यांनी केलं आहे.

No comments

Powered by Blogger.