बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त PM मोदींकडून अभिवादन
![]() |
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त PM मोदींकडून अभिवादन |
जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन
केलं आहे. 'महान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. धैर्यवान
बाळासाहेबांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देताना कधीही मागे-पुढे पाहिले
नाही. भारतीय मुल्यांबद्दल त्यांना नेहमीच अभिमान होता. ते लाखो लोकांना
प्रेरणा देत राहतील,' अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त
केल्या आहेत.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्ककडे ओढ घेत आहेत. तसंच देशभरातील दिग्गज नेत्यांकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे.
Post a Comment