शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे


शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सावंत यांच्यावर पक्षविरोधी कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सावंत यांचं सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदही धोक्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
तानाजी सावंत यांचे समर्थक सोलापूर सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे लक्ष्मीकांत पाटील यांची हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती आहे. लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांनी संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यासाठी बैठक घेऊन पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता
उस्मानाबाद जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत शिवसेना उपनेते आ.तानाजी सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शिवसेनेला धक्का बसला. सावंत यांनी भाजपचे नेते आ. राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकूर यांनी साथ देत भाजपा युतीचा झेंडा रोवला. राज्यात महविकास आघाडीचा बोलबाला असला तरी उस्मानाबाद जिल्हापरिषदेत नाट्यमय घडामोडी घडवत ही जिल्हा परिषद भाजपा शिवसेना यांनी ताब्यात घेतली.
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सावंत यांचे निकटवर्तीय लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील हे शिवसेनेच्या सात सदस्यांच्या संपर्कात राहिलाचाही ठोंगे पाटलांवर आरोप आहे. तसंच शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांच्या बंडखोरीमध्ये पाटील यांचाही वाटा असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसंच समर्थकांवरील कारवाईनंतर आता थेट तानाजी सावंत
मागील युती सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना शिवसेनेनं यंदा मात्र मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे तानाजी सावंत पक्षावर नाराज असल्याचंही बोललं जात आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तानाजी सावंत विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष निर्माण झाला आहे.
तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पोष्टर्स लावले आहेत. त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. शिवसेना आमदार तानाजी सावंतांविरोधात सोलापूर शहरात बॅनरबाजी बघायला मिळाली. खेकड्याच्या चित्रात तानाजी सावंतांचा चेहरा दाखवत विरोध व्यक्त करण्यात आला. हा खेकडा सोलापूर आणि धाराशिवची शिवसेना पोखरतोय, याच्या नांग्या वेळीच ठेचा, असा घणाघात शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.
 यांच्यावरही शिवसेनेकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.