राज्यात सर्व पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांना 'मराठी' सक्तीचं करणार - अजित पवार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य सत्कार
आज बारामतीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे
पहिल्यांदाच बारामतीत आले होते. ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अजित पवार
हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
होता. अजित पवार शहरात आल्यानंतर मुख्यरस्त्यावरून त्यांची जंगी मिरवणूक
काढण्यात आली. भव्य हार, तुरे, फुलं यांची बरसात अजित पवारांवर करण्यात
आली. क्रेनच्या साह्याने प्रचंड मोठे हार अजित पवारांना घालण्यात आले. काही
तास चाललेली ही मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी सभा झाली या सभेत अजित
पवारांनी मतदारांचे आभार मानले.
राज्यात राहणाऱ्या सर्वांना मराठी भाषा आलीच पाहिजे. त्यांनी मराठी बोलणं, शिकणं आणि वाचनं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यातल्या सर्व शाळांना पहिली ते दहावी मराठी सक्तिची केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत केली. शाळा कुठलीही असो त्यांना मराठी आलंच पाहिजे. काही मुलं जास्त गुण मिळविण्यासाठी इतर विषय घेतात. पण केवळ गुणांकडे बघू नका,आपली मातृभाषणं उत्तम पद्धतीनं येणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं.
आणि बारामतीकरांनी फक्त मलाच नाही तर रोहित पवारांनाही निवडून देण्यासाठी जीवाचं रान केलं असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता लोकांच्या कामासाठी झटा असा सल्लाही त्यांनी दिला. अजित पवार म्हणाले, बारामतीकरांनी मला लाखाच्या वर मतांनी निवडून दिलं. त्याची सर्व देशात दखल घेतली गेली.
सत्ता आली तरी ती डोक्यात जाऊ देऊ नका. गैरप्रकार, गैरव्यवहार करू नका, कुठे चुकलं तर अधिकाऱ्यांशी वाद घालू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. बारामतीच्या विकासासाठी यापुढेही काम करणार असल्याचं ते म्हणाले. पण या सत्कार सोहळ्याला आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे अनुपस्थित होत्या त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलाय.
Post a Comment