शाळांत रोज तीनदा वाॅटर बेल ! उद्धव ठाकरे सरकारने ३ महत्त्वाचे निर्णय घेतले.

शाळांत रोज तीनदा वाॅटर बेल ! उद्धव ठाकरे सरकारने  ३ महत्त्वाचे निर्णय घेतले.

उद्धव ठाकरे सरकारने मंगळवारी ३ महत्त्वाचे निर्णय घेतले. शरीरात पाण्याच्या कमतरतेने अनेक आजार होतात. विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळांत वॉटर बेल उपक्रम राबवला जाईल. शाळेच्या वेळापत्रकात ३ वेळा घंटा वाजवण्याबाबत मुख्याध्यापकांनी वेळ निश्चित करावी, या वेळेत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा द्यावी, असा जीआर सरकारने काढला. दरम्यान, जनजागृतीसाठी 'स्वागत भारतीय प्रजासत्ताकाचे, ध्येय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे' हा उपक्रम राज्यातील शाळांत राबवला जाईल.
शाळांत संविधानाचे वाचन
घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत या उद्देशाने येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील शाळांमध्येेे दररोज परिपाठावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.
मराठी विषय बंधनकारक
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत आगामी अधिवेशनात कायदा करणार असल्याची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिली.

No comments

Powered by Blogger.