इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान कोसळलं, 180 प्रवाशांचा मृत्यू
युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं हे विमान होतं. इराणची राजधानी तेहरानमधल्या इमाम खोमेनी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते कोसळल्याचं वृत्त Fars-State या इराणच्या वृत्तसंस्थेने दिलं आहे. हे विमान युक्रेनची राजधानी किव्हला जात होतं.
मात्र, हा अपघात आहे की घातपात हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी ड्रोन हल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना ठार केलं होतं. त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष पेटला आहे. त्यामुळे विमान कोसळण्याच्या घटनेचा सुलेमानी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, यादृष्टीनेही तपास सुरू आहे.
घटनास्थळी बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या आणीबाणीविषयक सेवेचे प्रमुख पिर्होसेन यांनी इराणच्या स्थानिक प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे, "विमानाने पेट घेतला आहे. आम्ही आमचं पथक पाठवलं आहे. काही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढू, अशी आम्हाला आशा आहे."

"मात्र, या दुर्घटनेतून कुणी बचावलं असण्याची शक्यता नाही."
Post a Comment