आजचे राशीभविष्य

मेष : जोडीदाराच्या तब्येतीची चिंता सतावेल. पूर्वी पैशांची बचत केल्याने आज आर्थिक चिंता जाणवणार नाही. कठीण प्रसंगातून सहिसलामत सुटका होईल.

वृषभ : मोकळा वेळ घरातील रखडलेली कामे करण्यात घालवा. बंधू-भगिनीकडून आर्थिक लाभ होतील. भविष्यातील योजना जाहीर करू नका.

मिथुन : मेहनती व्यावसायिकांना यशाची चव चाखायला मिळेल. नोकरदार व्यक्तींना मानसन्मानाचे योग येतील. एकांतात राहावे असे वाटेल.

कर्क : सर्वच स्तरांवर जिंकून देणारा दिवस. अनेक योजना फलद्रुप होतील. रिकाम्या वेळेत आवडते छंद जोपासण्याकडे कल राहील.

सिंह : पती-पत्नीमधील नाते फुलाप्रमाणे बहरेल. कामकाजाच्या ठिकाणी विरोधकांना नामोहरम कराल. आर्थिक लाभ झाल्याने देणी फेडाल.

कन्या : आप्तेष्टांमध्ये क्षुल्लक कारणांवरून गैरसमज होतील. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय आज घेण्यास हरकत नाही. सहकाऱ्यांच्या अडचणी जाणून घ्या.

तुळ : हे जीवन सुंदर आहे, असे वाटण्याचा दिवस. आवश्यक बाबींची पूर्तता वेळीच केल्यास कामात वरचढ ठराल. प्रिय व्यक्तीला गृहित धरणे महागात पडेल.

वृश्चिक : रखडलेली देणी प्राप्त होतील. सहकाऱ्यांची कामात उत्तम साथ लाभेल. उत्तरार्धात स्वातंत्र्यवीरांचे आत्मचरित्र वाचाल.

धनु : आजचा दिवस खूषखबर घेऊन येणारा. कायदेविषयक पुस्तक प्रदर्शनाला भेट दिल्याने नवीन गोष्टी कळतील. जनसंपर्क वाढेल.

मकर : सकारात्मक ऊर्जा विविध चांगल्या कामांसाठी अथवा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी वापराल. महिलावर्गाचे खरेदीत मन रमेल. आज शीघ्रकोपीपणा टाळायला हवा.

कुंभ : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे विसरू नका. पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागाल. विवाहितांमध्ये वाद होण्याची शक्यता.

मीन : संततीला उत्तम करिअर घडण्यासंदर्भात मार्गदर्शन कराल. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्याचे स्पष्ट योग आहेत. नवीन ओळखी होतील.

No comments

Powered by Blogger.