महिलांनाही लष्करात समान संधी द्या

लष्करातील तुकडीचं नेतृत्व महिलांकडे देण्यासंदर्भात केंद्र सरकारनं नकारात्मक भूमिका घेतली होती. या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारत दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं पालन करत महिलानाही लष्करात समान संधी द्या, असे आदेश दिले आहेत.
सैन्यातील तुकडीचं नेतृत्व महिलांकडे (कमांड पोस्ट) देण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला होता. लष्करातही महिलांना तुकडीचं नेतृत्व दिलं जावं, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या आव्हान याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचे कान उपटत दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं महिलांविषयी घेतलेल्या भूमिकेवरून केंद्र सरकारची कानउघडणी केली. लष्करातही समानता आणावी लागेल. केवळ शारीरिक मर्यादा आणि सामाजिक नियमांमुळे महिलांना समान संधी नाकारता येणार नाही. हे कधीही स्वीकारलं जाणार नाही. केंद्र सरकारने महिलांविषयीचा आपली मानसिकता बदलावी आणि दिल्ली उच्च न्यायालयानं महिलांना कमांड पोस्ट देण्यासंदर्भात कायमस्वरूपी कमिशन स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पालन केंद्र सरकारनं करावं. तीन महिन्यात केंद्र सरकारने कमिशन स्थापन करावा,” अशा शब्दात न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी केली.

No comments

Powered by Blogger.