फुल-विक्रेत्याची पत्नी झाली 30 कोटींची मालकीन
![]() |
फुल-विक्रेत्याची पत्नी झाली 30 कोटींची मालकीन |
कर्नाटकमधील चन्नापटना इथं वस्तीत राहणाऱ्या एका फुल विक्रेत्या सईद मलिक बुरहान यांच्या पत्नीसोबत असंच काही घडलं ते ऐकून कुणीही थक्क होईल. जवळ 60 रुपये असलेलं हे दाम्पत्य रातोरात 30 कोटींचे मालक झाले होते. पैसाच सर्व काही असतो असं नाही, पण पैशाशिवाय कोणतीही गोष्ट पुढे सरकत नाही, हे तितकच खरं आहे. समजा तुमच्या खात्यात 60 रुपये असेल आणि तुम्हाला दुसऱ्या क्षणी कुणी 30 कोटी रुपये ट्रान्सफर केले तर? साहजिकच आनंद गगणात मावणार नाही.
घडलेली हकीकत अशी की, सईद मलिक बुरहान हे एक फुल
विक्रेत आहे. 2 डिसेंबर रोजी बँकेचे अधिकारी अचानकपणे सईद बुरहान यांच्या
घरी पोहोचले आणि घराची चौकशी सुरू केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या
घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी 'तुमच्या बँकेच्या खात्यात 30
कोटी रुपये कुठून आले?' असा प्रश्न विचारताच बुरहान यांना एकच धक्का बसला.
60 रुपये असलेल्या बँक खात्यात अचानक 30 कोटी रुपये कुठून आले या
प्रश्नाने बुरहान दाम्पत्य हैराण झाले. मुळात बुरहान दाम्पत्याची घरची
परिस्थिती ही जेमतेम होती. त्यानंतर अचानक झालेल्या धनलाभामुळे आनंद साजरा
करावी की चौकशीला सामोरं जावं अशी परिस्थिती समोर उभी ठाकली होती.
बँकेच्या
अधिकाऱ्यांनी सईद आणि त्यांची पत्नी रेहाना यांना आधार कार्ड घेऊन बँकेत
बोलावलं होतं. तसंच त्यांनी एका कागदपत्रावर सही करण्यासाठीही सांगितलं
होतं. आमच्यावर दबाबही टाकला होता पण आम्ही सही केली नाही, असं बुरहान
यांनी सांगितलं.
चौकशी सुरू असताना बुरहान यांना लक्षात आलं की,
त्यांनी एका ऑनलाइन पोर्टलवरून पत्नी रेहाना यांच्यासाठी साडी खरेदी केली
होती. त्यानंतर तुम्ही कार जिंकली असल्याचं सांगून त्यांच्याकडून बँक
खात्याची मागणी केली होती. पत्नीच्या खात्यात फक्त 60 रुपये होते. पण अचानक
एवढे पैसे कसे आणि कुठून आले हे काही समजलं नाही.
त्यानंतर बुरहान
यांनी आयकर विभागाकडे या प्रकरणी धाव घेतली आणि तक्रारही दाखल केली.
सुरुवातील आयकर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तयार नव्हते.
त्यानंतर रामनगर येथील चन्नापटना शहरातील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल
केला.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, बुरहान यांनी आपल्या
खात्यातून आर्थिक व्यवहार केला. पण त्याबद्दल त्यांनाच माहिती नव्हती.
त्यांच्या खात्यात एवढी मोठी रक्कम कुठून आणि कशी आली याबद्दल तपास सुरू
आहे. ज्यांनी कुणी पैसे पाठवले त्याचा शोध घेतला जाईल आणि अटक केली जाईल,
असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.
Post a Comment