16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार
![]() |
16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार |
ATM कार्डमधून पैसे काढण्याचे (RBI allows card holders to enable
disable cards for online)नियम बदलणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार,
ATM कार्डने केले जाणारे व्यवहार सोपे करण्यासाठी हे नियम करण्यात आले
आहेत. त्याचबरोबर खात्यामधले पैसे सुरक्षित राहावे हाही यामागचा उद्देश
आहे.
याआधी 1 जानेवारी 2020 पासून SBI ने ATM मधून पैसे काढण्याचे
नवे नियम जारी केले होते. आता SBI ने वनटाइम पासवर्ड म्हणजेच OTP वर आधारित
कॅश विथड्रॉल सिस्टीम सुरू केली आहे. यानुसार सकाळी 8 पासून रात्री 8
वाजेपर्यंत पैसे काढायचे असतील तर OTP द्यावा लागेल.
नवे नियम
1. ज्या लोकांना परदेशात जावं लागत नाही त्यांच्या कार्डवर ओव्हरसीजची सुविधा मिळणार नाही.
2. ज्या लोकांकडे सध्या हे कार्ड आहे त्यांनी त्यांच्या कार्डचं काय करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे.
3. ग्राहक 24 तासांत कधीही त्यांचं कार्ड ऑन/ ऑफ करू शकतात. यासाठी ते मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतात.
4. बँक आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल करण्याची सुविधा देणार आहे.
5. हे नवे नियम प्रिपेड गिफ्ट कार्ड आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाही.
Post a Comment