महिलेवर अॅसिड अॅटॅक करणाऱ्याला जागेवरच दिला चोप
![]() |
महिलेवर अॅसिड अॅटॅक करणाऱ्याला जागेवरच दिला चोप |
नागपूर जिल्हातील सावनेर तालुक्यात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला
केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह तिघे जखमी
झाले आहेत. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरोपीला तिथंच चोप देत
पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर
कारवाई करण्याची मागणी रेटून धरत पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला.
किशोर कान्हेरीया असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर डॉ. सोफी
सायमा, गौरी सोनेकर आणि सुरेखा बंडे अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या सोबत
असलेल्या डॉ. शुभ्रा जोशी, डॉ.सुकन्या कांबळे थोडक्यात बचावल्या.
जखमींवर
नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉ. सोफी या नागपूरातील
इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये असिसंन्ट लेक्चरर आहेत. त्या नॅशनल एड्स
कंन्ट्रोल आँग्रोनायजेशन या प्रोजेक्टच्या सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या.
सर्वेक्षण करत असताना माथेफिरू आरोपी किशोरने त्यांच्यावर ऍसिड फेकले.
त्यात डॉक्टरसह दोघी जखमी झाल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी किशोरला पकडून बदडले आणि
पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाय नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी
केली होती. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण या
प्रकरणामध्ये एकतर्फी प्रेमाचा काही संबंध नाही . तसंच या प्रकरणाचा
हिंगणघाट जळीत प्रकरणाशी संबंध जोडू नये, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Post a Comment