‘बागी 3’मध्ये तब्बल ४०० स्फोटकांचा केला वापर

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अॅक्शन सीन हे जणू समीकरणचं झालं आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांमधील त्याचे अॅक्शन सीन चर्चिले गेले आहेत. टायगर लवकरच ‘बागी 3’ या चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा धमाकेदार अॅक्शन सीन्सने भरलेला ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर यातील काही सीन हे व्हीएफएक्सद्वारे तयार केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या चित्रपटात व्हीएफएक्सचा भरणा केला नसून चित्रपटातील दृश्य खरी वाटावित यासाठी तब्बल ४०० स्फोटकांचा वापर केला आहे.
या चित्रपटामध्ये तब्बल ४०० स्फोटकांचा वापर करण्यात आला असून टायगरने काही अॅक्शन सीन स्वत: केले आहेत. यात त्याने कोणताही बॉडी डबलचा वापर केलेला नाही. मात्र या दृश्यांचं चित्रीकरण सुरु असताना चित्रपटाच्या टीमने सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली होती.
“चित्रपटातील सीन खरे वाटावेत म्हणून आम्ही व्हीएफएक्सचा वापर केला नव्हता. तर त्याऐवजी खरे स्फोटके वापरली होती. यात एका सीनसाठी आम्हाला ९० ते ९५ बॉम्बचा वापर करावा लागला होता. परंतु हे सीन करताना मनात एक भीती आणि चिंता कायम होती. कारण हे सगळे सीन टायगर स्वत: करत होता”, असं चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितलं.

No comments

Powered by Blogger.