मुंबईत फक्त १० रुपयात चालवा बाईक
- केवळ १० रुपये देऊन तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक बाईक चालवता येणार आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य : yulu.bike)

शुक्रवारी(दि.३१), एमएमआरडीए आणि Yulu Bikes यांच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला असून, पुढील १० दिवसांत ई-बाईक सुविधा सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे.

MMRDA च्या आगामी प्रकल्पानुसार बांद्रा आणि कुर्ला स्टेशन परिसरात २५ ते ३० ई-बाईक्स ठेवण्यात येणार आहेत. या बाईक्स लॉक असतील. त्या अनलॉक करण्यासाठी युलू अॅप डाऊनलोड करावे लागेल.
सध्या या सेवेची भाडे रचना प्राथमिक स्वरूपाची असून, या सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत त्यामध्ये बदल केला जाईल.

ही सुविधा अॅपद्वारे उपलब्ध करण्यात आली असून अॅपवरूनच ई-बाइक स्थानकातून घेण्याची सुविधा असेल. या सेवेसाठी सुरुवातीला २५० रु. सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतर युलु स्थानकावरून ई-बाइक घेताना १० रु. शुल्क आकारले जाईल आणि बाइक जमा केल्यावर अॅपमधूनच, प्रत्येक १० मिनिटांसाठी रु. १० याप्रमाणे भाड्याची रक्कम कापली जाईल.
Post a Comment