जपानच्या शीपमध्ये अडकलेल्या मुंबईच्या तरुणीचं सरकारला आवाहन

कोरोनापासून वाचवा! जपानच्या शीपमध्ये अडकलेल्या मुंबईच्या तरुणीचं सरकारला आवाहन
जपानच्या शीपमध्ये अडकलेल्या मुंबईच्या तरुणीचं सरकारला आवाहन

जपानच्या योकोहामा बंदरात अडकलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 175 वर पोहोचली आहे. या जहाजावरील भारतीय सुरक्षा अधिकाऱ्याने बुधवारी भारत सरकारला मदतीसाठी आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात 242 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर चीनमध्ये मृतांची संख्या वाढून 1365 इतकी झाली आहे. त्याचबरोबर 59 हजाराहून अधिक जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.
जपानच्या क्रुझ जहाजावरील भारतीय सुरक्षा अधिकारी सोनाली ठाकूर (वय 24) मुंबईची रहिवासी आहे.एका वृत्तवाहिनीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी भारत सरकारला मदतीचं आवाहन केलं आहे. सोनाली म्हणाली, येथे संक्रमण वेगाने पसरत आहे. आम्हाला भीती आहे की, आम्हीसुद्धा या आजाराला बळी पडू. आम्हाला सुखरुप घरी परत जायचे आहे.
यापूर्वी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट केले होते, कोरोना व्हायरस हा आपल्या लोकांसाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. मला वाटते की, सरकार या धमकीस गांभीर्याने घेत नाही. दरम्यान, आंध्र प्रदेशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीने मंगळवारी एका 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी याची खात्री केली की तो साधा ताप आहे, त्याला कोरोनाव्हायरस नव्हता.

No comments

Powered by Blogger.