पुन्हा पुलवामा हल्ल्याचा कट; 'गझनवी फोर्स' सक्रिय
![]() |
पुन्हा पुलवामा हल्ल्याचा कट; 'गझनवी फोर्स' सक्रिय |
वर्षभरापूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१९ला pulwama attack पुलवामातील अवंतीपोरा येथे जहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या वाहनांच्या ताफ्याला निशाणा केलं होतं. या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. या घटनेने सारा देश हळहळला होता. ज्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. असं असतानाच पुन्हा एकदा दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याचं कळत आहे. पुलवामा हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी होती, की याचा आवाज १० ते १२ किमीपर्यंतच्या परिसरात ऐकू गेला होता.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नेतृत्त्वात आयएसआय या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणेतील दहशतवाद्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा कट रचला आहे. या गटाला संयुक्तरित्या 'गझनवी फोर्स' असं नावही देण्यात आलं आहे. ज्यामध्ये जैश-ए- मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि अद बद्रच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
पुढील काही दिवसांमध्ये या गटाकडून आयईचीचा वापर करत सुरक्षा दलांच्या ताफ्यावर पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याचं सांगण्यात येत आहे. याच माहितीच्या आधारे सर्व सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Post a Comment