कपूर कुटुंबामध्ये सध्या लग्नाचा माहोल


कपूर कुटुंबामध्ये सध्या लग्नाचा माहोल असून लवकरच अरमान जैन आणि अनिस्सा मल्होत्रा विवाहबंधनात बांधले जाणार आहेत. अरमान हा राजू कपूर यांचा नातू आणि अभिनेत्री करीना कपूर व करिश्मा कपूर यांचा आत्येभाऊ आहे. कपूर कुटुंबात मेहंदी आणि संगीताच्या कार्यक्रमाची धूम असताना सोशल मीडियावर मात्र चर्चा फक्त तैमुरचीच होताना दिसतेय.
अरमान जैन हा राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा आहे. अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं डेट करत आहेत. गेल्या वर्षी कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत अरमानचा साखरपुडा पार पडला. अरमानने ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला. त्यापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करण जोहरसोबत काम केलं.

No comments

Powered by Blogger.